• marathi jobs logo
  |  Skip Navigation Links
  • मुखपृष्ठ
  • हिंदी जाहिराती
  • मराठी जाहिराती
  • ताज्या बातम्या
  • प्रवेशपत्र
  • निकाल
  • ऑनलाईन प्रश्न
  • जुन्या परीक्षा
  • घडामोडी
  • सामान्यज्ञान
  • विशेष

संपूर्ण माहिती :


राणी लक्ष्मीबाई

Published By : marathijobs.com (⏱ 13 May, 2017)
     


        लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

बालपण :

        लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

व्यक्तिमत्त्व :

        धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

        १८५७ मध्ये स्वातंत्र संग्रामाला सुरवात झाली. आणि राणीने झाशी आपल्या ताब्यात घेतली.हि गोष्ट इंग्रजांना कळताच इंग्रज सेनानी सर ह्यु रोज झाशीवर चालून गेला. राणीने सतत अहोरात्र किल्ला लढविला.,पण फितुरीने दगा दिला. त्यांमुळे पुत्र दामोधर याला पाठीशी बांधून व मोचक्या सैन्यासह शत्रू सैन्याचा वेढा भेदून राणीने नानासाहेब व तात्या टोपे ज्या किल्ल्यात होते त्या काल्पी किल्ल्याच्या दिशेने घोडा लढविला. पण ह्यु रोजच्या सैन्याने तिथेही पेशव्यांच्या बेशिस्त सैन्याचा पराभव केल्याने नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यासह राणी ग्वाल्हेरला गेली.

        ग्वाल्हेरच्या शिंद्यांना पराभूत करून नानासाहेबांनी ते राज्य आपल्या ताब्यात घेतले. परंतु शत्रू येथेही येईल त्याची जाणीव राणी परोपरीने देत असतानाही नानासाहेब राज्याचे राजे होण्यासाठी स्वत :राज्याभिषेक करून घेण्यात दंग झाले व तेवढ्यात  ह्यु रोज व त्याचे सैन्य ग्वाल्हेरवर चालून गेले.अतितटी चा संग्राम पुन्हा सुरु झाला. आणि तेथेच नाना साहेबांचा पराभव झाला. राणीने पराक्रमाची शर्थ केली,पण नाईलाज झाला. तेव्हा निवडक सहकार्यांश व दामोधरा सोबत ती वायू वेगाने निसटून जावू लागली. सरह्यु  चे सैनिक तिचा पाठलाग करीतच होते. त्यांनी तिला गाठले. एका ओढ्याच्या काठी राणीचा घोडा थबकल्याचि संधी साधून एकाने तिच्या वर तलवारीचा धाव केला. त्यामुळे त्या घावाने तिचे १८ जून १८५८ रोजी निधन झाले.


 
     

0 Votes have rated this Naukri.
Average Rating is 0


 

विभाग निहाय

  • ✔अभ्यासक्रम ( 4 )
  • ✔प्रवेशपत्र सुचना ( 96 )
  • ✔केंद्र-शासित नौकरी ( 222 )
  • ✔सामान्य ज्ञान ( 715 )
  • ✔शैक्षणिक माहिती ( 7 )
  • ✔प्रवेश प्रक्रिया ( 6 )
  • ✔सरकारी नौकरी ( 2265 )
  • ✔व्यक्ती परीचय ( 204 )
  • ✔ताज्या बातम्या ( 77 )
  • ✔पुस्तक परिचय ( 3 )
  • ✔निकाल ( 52 )
  • ✔यशोगाथा ( 18 )
  • ✔खाजगी नौकरी ( 133 )
  • ✔लेख विशेष ( 53 )
  • ✔चालु घडामोडी ( 22 )
  • ✔शिष्यवृत्ती माहिती ( 3 )
epapers app logo
  • Home
  • About us
  • Services
  • Terms
  • Sitemap
  • Contact